सेंद्रिय कर्ब

| 26 Mar 2024 | 210 |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

            सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे असे म्हणल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही. पृथ्वीतलावर व भूगर्भात कार्बन हा मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. त्याच प्रमाणे कृषी क्षेत्रा मध्ये सर्वात जास्त सहभाग सेंद्रिय कर्बाचा असतो. सेंद्रिय कर्बावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि सच्छिद्रता ठरवली जाते. तर चला पाहूया सेंद्रिय कर्बाची माहिती.


सेंद्रिय कर्ब म्हणजे काय?

            ह्या पृथ्वी तलावर प्रत्येक सजीवाच्या मृत्यू नंतर त्याचे विघटन होत असते. त्याचे विघटन झाल्यास कार्बन बाहेर पडत असतो. तसेच जमिनीतील सजीवांनी कोणत्याची पदार्थाचे विघटन केल्यावर त्यातून बाहेर पडणाऱ्या कर्ब अथवा कार्बन ला सेंद्रिय कर्ब असे म्हणतात. जमिनी मध्ये सातत्याने कर्ब पडत राहण्याची क्रिया निस्रगातील काही जीवांकडून होत असते. सेंद्रिय शेती मध्ये पिकांना जमिनीतील अन्नाची उपलबद्धता काही सूक्ष्म जिवाणूंकडून होते. त्यामुळे सूक्ष्म जीव जिवंत राहण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचा आहे. 5 ते 20 टक्के कर्ब हा प्रकाश संश्लेषणद्वारे निर्माण होतो. त्याच बरोबर पिकाला कर्ब वायू जमिनीतून मिळतो. हे सेंद्रिय कर्ब सूक्ष्म जिवाणू किंवा बुरशांमुळे मुळे कुजायला लागते म्हणजे restructure होते , त्या दरम्यान महत्वाचे घटक व कर्ब वायू बाहेर पडतात. त्याच बरोबर सूर्यप्रकाश मुळे तयार झालेले तापमान व जमिनीतील कर्ब कुजताना तयार झालेले तापमान आणि पाणी ह्यामुळे कर्ब कुजून पाणी सुटायला लागते.  त्यात enzymes व harmones असतात. अशा प्रकारे कुजून तयार झालेल्या पाण्याला आपण ह्यूमिक ऍसिड देखील म्हणतो. ह्या सर्व प्रक्रियेला सेंद्रिय कर्ब जबादार असतो. कुजण्याच्या प्रक्रियेत आवश्यक बुरशी आणि जिवाणूंना जगवण्यासाठी व काम करण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्वाचा असतो. अत्यंत चांगल्या परिस्थितीमधील जमिनीत व जंगल मध्ये सेंद्रिय कर्ब हा ५ टक्क्यापेक्षा जास्त असतो.  हरित क्रांती यायच्या आधी शेतीमध्ये हा कर्ब २ ते ३ टक्के असायचा. मात्र तो आता ०.२-०.४ टक्क्यांवर आलाय. जास्त उत्पादनासाठी कर्बाचे प्रमाण कमीत कमी १ टक्का जमिनीत असणे गरजेचे आहे.

            अनादी काळापासून सेंद्रिय कर्बाचे चक्र नैसर्गिक रित्या चालू आहे. उदा. परंपरागत शेती करत असताना शेतात पीक आल्यावर धान्य चा वापर मनुष्य करतात, उरलेला पीक चाऱ्याच्या रूपात आपण जनावरांना देतो. त्यानंतर जनावरांकडून मिळणारे शेण परत शेतात जाते.त्यातून सेंद्रिय कर्ब परत तयार होते. अशा प्रकारे सेंद्रिय कर्बाचे चक्र पूर्ण व्हायचे. त्याच सोबत झाडाची पानगळ, शेतातील उरलेले पिकांची मुळे हे कुजून परत सेंद्रिय कर्ब तयार होते. पण जेव्हापासून पिकावर आणि मुळांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाचा वापर चालू झाला, तेव्हा पासून सेंद्रिय कर्बाचे चक्र पूर्ण होण्यात अडथळा निर्माण होऊ लागले. तसेच नांगरणी मुळे सुद्धा पिकांची मुळे काढून टाकल्यास सेंद्रिय कर्ब तयार होत नाहीत. ह्याला उपाय म्हणजे धान्य काढल्यानंतर अथवा मनुष्यास उपयुक्त पिकातील भाग सोडून पिकाचे अवशेष शेतात कुजवणे.उदा. उसाची पाचट शेतात कुजवणे.


  सेंद्रिय कर्बाचे ३ प्रकार असतात.

१. volatile(उष्णतेने वाफ होणे) म्हणजेच उडनशील कर्ब- मुख्य पिकामध्ये आपण आंतरपीक घेतले असता, फुलोऱ्या आधी जमिनीत गाडल्यास त्याचे कर्बामध्ये मध्ये रूपांतर होईल. परंतु तो volatile स्वरूपात लवकरच उडून जाईल.

२. अस्थिर कर्ब - आंतरपीक घेतले असता, फुलोऱ्या नंतर कापणी करून जमिनीत गाडल्यास कर्बामध्ये त्याचे रूपांतर होऊन थोडाच काळ टिकवून राहील. परंतु, त्याचे ह्यूमस मध्ये रूपांतर होणार नाही. म्हणजेच हा कर्रब अस्थिर असतो.आणखी, पानांमधील क्लोरोफिल (कर्ब)सुद्धा  अस्थिर असते.

३. स्थिर कर्ब - ज्या सेंद्रिय घटकांना कुजायला वेळ लागतो अथवा ते जड असतात, त्यापासून मिळणारे कर्ब हे १ टक्क्या पर्यंत आणि दीर्घ कालापर्यंत कर्ब पुरवठा करते. उदा. एखादे लाकूड जमिनीत कुजून राहिल्यास सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात तयार होते आणि दीर्घ काला पर्यंत टिकून राहते. त्याशिवाय धान्य तयार झाल्या नंतर कापणी करून पिकाचे अवशेष जर जमिनीत गाडले तर ह्यूमस च्या रूपात सेंद्रिय कर्ब जमिनीत टिकून राहतो.त्यास स्थिर कर्ब असे म्हणता येईल.


* जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण --- सुपीकता निकष

०.२ टक्क्यापेक्षा कमी --- अत्यंत कमी

०.२१ ते ०.४० टक्के या दरम्यान --- कमी

०.४१ ते ०.६० टक्के --- मध्यम

०.६१ ते ०.८० टक्क्यांपर्यंत --- जास्त

०.८ पेक्षा अधिक --- खूप जास्त


सेंद्रिय कर्बाचे पिकाच्या दृष्टीने फायदे:

- सेंद्रिय कर्ब जास्त असलेल्या जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या अधिक असते. परिणामी पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता अधिक होते. 

- अशा जमिनीत सेंद्रिय पदार्थ अधिक असल्यामुळे जमिनीची भौतिक सुपीकताही लक्षणीय प्रमाणात सुधारते. 

- जमिनीची जलधारणाशक्ती, पोत सुधारतो, त्यामुळे क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. जमिनीत हवा खेळती राहिल्याने मुळांची निरोगी, जोमदार वाढ होते. 

- जमिनीचा सामू अधिक असल्यास तो कमी होण्यास मदत होते. 

- जीवाणूद्वारे सेंद्रिय आम्ले सोडली जातात (humic acid). या आम्लांमुळे रासायनिक अभिक्रिया वाढून स्थिर झालेली सेंद्रिय व रासायनिक अन्नद्रव्येही पिकांना उपलब्ध होऊ लागतात. म्हणून सेंद्रिय कर्बाची पातळी वाढवणे जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकतेसाठी महत्त्वाचे ठरते.


सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय:

- शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड केक, प्रेसमड केकचे कंपोस्ट, हिरवळीची पिके, अखाद्य पेंडी (निंबोळी पेंड, करंज पेंड, सरकी पेंड इ.)

- निसर्गातील सेंद्रिय पदार्थ हे जमिनीच्या दृष्टीने मोलाचे असतात. उदा. शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष इ. पासून सेंद्रिय खत करून वापर करावा. उदा. उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे.

- पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे.

- जमिनीस आवश्यक विश्रांती दिल्यावरही सेंद्रिय कर्ब टिकण्यास मदत होते.

- पिकांसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा.

- पिकांच्या गरजेनुसारच पाण्याचा वापर करावा.

- हिरवळीच्या पिकांचा (उदा. ताग, धैंचा, चवळी इ.) सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ती जमिनीत गाडावीत.

- सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून, या थराची धूप होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी पीक अवशेषांचा mulching म्हणजेच आच्छादन म्हणून उपयोग करावा.

- जमिनीत जिवामृत, व्हर्मिवाश यांचाही वापर करावा.

- शेतीची पशुसंगोपन सोबत सांगड घालावी.


            तर मित्रानो अशा प्रकारे आपण सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन सुपीक करूया आणि पर्यायाने जमिनीचे आणि आपले आरोग्य राखुया. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. माहिती आवडल्यास share करा. धन्यवाद.


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List