तण नियंत्रण

| 18 Mar 2024 | 488 |


नमस्कार शेतकरी बंधूनो,

    तणांमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही पिके व पिकांच्या सभोवतील कृषि परिस्थितीच्या घटकांवर अवलंबून असते. तणांमुळे पिक उत्पादनात सरासरी ३३ टक्के घट येते, या तुलनेत कीटकांमुळे २६ टक्के, रोगामुळे २० टक्के व इतर घटकांमुळे २१ टक्के घट येते. याचा अर्थ इतर कोणत्याही घटकांमुळे येणाऱ्या घटीपेक्षा पिक उत्पादनामध्ये तणांमुळे येणारी घट ही अधिक असते. अंदाजे, पीक उत्पादनाच्या एक तृतीयांश भाग हा तणांसोबत स्पर्धा करण्यात जातो. तणे पिकांच्या बरोबरीने अन्नद्रव्ये, ओलावा, सूर्यप्रकाश, हवा, जागा यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पीक उत्पादनात घट येते. तणांवर कीड व रोगांना आश्रय मिळतो. पीक व्यवस्थापन करताना तण नियंत्रणावर जास्त खर्च करावा लागतो. तणांमुळे मानव तसेच जनावरांना ऍलर्जी निर्माण होऊ शकते. या सर्व बाबींचा विचार करता प्रभावी तण व्यवस्थापनासही पिक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. 


तर चला पाहूया तण नियंत्रण कसे करावे. खालीलप्रमाणे, तण नियंत्रण हे ४ पद्धतीत मोडली जाते.

 • प्रतिबंध
 • निर्मूलन
 • नियंत्रण
 • व्यवस्थापन


अ) प्रतिबंधात्मक तण नियंत्रण:

 1. कंपोस्ट खताच्या खड्ड्यात तण घालणे टाळा.
 2. रोपवाटिका किंवा लागवड साहित्य तणांपासून मुक्त असावेत.
 3.  सिंचन वाहिन्या, कुंपण-लाईन आणि पीक नसलेले क्षेत्र स्वच्छ ठेवा.
 4. सतत तणांचा शोध घ्या, व दिसल्यास लगेच तण नष्ट करा.
 5. ज्यामध्ये तणांच्या बिया आढळणार नाहीत, असे निवडक आणि चांगल्या प्रतीचे प्रमाणित बियाणे वापरा.
 6. तणांची उगवण रोखण्यासाठी उगवणपूर्व तणनाशकांचा वापर करावा.
 7. पूर्ण कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत वापरणे
 8. पेरणीपूर्वी तणे नष्ट करणे
 9. जमिनीची पूर्वमशागत योग्य रीतीने करणे.


ब) निर्मूलन (पूर्णतः काढून टाकणे) :

शेतामधून संपूर्ण पणे तण काढून टाकणे अथवा मारून टाकणे हा सोपा उपाय आहे. पण हि पद्धत खूप अवघड आहे व त्यास जास्त खर्च येतो . हि पद्धत ग्रीन हाऊस आणि नर्सरीमध्ये वापरता येईल.


क) नियंत्रण :

तणांची वाढ रोखणे व गरज पडल्यास काढून टाकणे अथवा नष्ट करणे, जेणेकरून  पिक वाढीवर त्याचा परिणाम होणार नाही.


ड) तण व्यवस्थापन :  

तणांचा प्रादुर्भाव शेतामध्ये झाल्यानंतर तणांची तीव्रता कमी करण्यासाठी वापरावयाच्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात. यामध्ये प्रामुख्याने भौतिक, मशागत व यांत्रिक पद्धतीचा समावेश होतो. उदा. हाताने तण उपटणे, कोळपणी, खुरपणी, खांदणी, मशागत, तणांची कापणी व छाटणी करणे, तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे, जाळणे अथवा आच्छादनाचा वापर करणे.

सर्व संभाव्य पद्धतींचा वापर करून तणांची संख्या ची व्यवस्थापन करणे.

१) यांत्रिक पद्धत : 

 1. मशागती: नांगर किंवा डिस्कचा वापर करून जमिनीतून तण काढून सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आणले जाते. 
 2. कुदळ : हात कुदळीचा वापर करून वार्षिक आणि द्विवार्षिक तण पूर्णपणे काढून टाकल्या जातात.  हाताने तण काढणे:  
 3. हाताने किंवा अवजारे वापरून  काही तण बाहेर काढणे 
 4. खोदकाम : हा बारमाही तण च्या बाबतीत योग्य उपाय आहे.
 5. कोयता/ विळा : तणांचा वरचा भाग विळ्याने  काढून टाकला जातो, त्यामुळे तण बीजोत्पादन नियंत्रित होते. 
 6. जाळणे: तण जाळणे हे बऱ्याचदा किफायतशीर व व्यावहारिक आहे. पण  पीक उत्पादन क्षेत्रात हा उपाय नेहमीच शक्य नाही.
 7. तण प्रभावी क्षेत्रात पाणी साठवणे: वनस्पतींची वाढी साठी लागणारा ऑक्सिजन पुरवठा कमी करून तण नष्ट करतात . हे केवळ बागेच्या जमिनीत किंवा पाणथळ अवस्थेतच शक्य आहे.


२) पारंपरिक तण नियंत्रण:

 1. उन्हाळी नांगरणी उन्हाळ्याच्या पावसानंतर लगेचच केली जाते. यामुळे तण जमिनीवर येऊन त्यांना कडक ऊन लागते. त्यामुळे तणाचा नाश होतो.
 2. शेताची तयारी :  सतत काढून टाकून ताण काढून शेत तणमुक्त करणे.  तणांशी अधिक चांगली स्पर्धा करू शकणारे पीक निवडा जसे कि, चवळी शेंगा , सुदान गवत , ज्वारी.हि वेगाने वाढणारी पिके तणांना प्रभावीपणे दडपून टाकतात. ४- सर्वोत्कृष्ट पिकांची संख्या राखणे पुष्कळ पिकांची  संख्या असल्यास ती जास्त जमीन व्यापतात व त्यामुळे त्यामुळे तणांची वाढ अवघड होते. 
 3. पिकांची फेर पालट: फेर पालट केल्यास पीक पद्धतीतील विशेष तणांचे वर्चस्व कमी  होते.
 4. आंतरपिकांची लागवड :आंतरपीक जमिनीला लवकर व्यापते आणि तणांची  वाढ कमी करते . उदा., : विस्तीर्ण जागेत असलेल्या पिक उदा. मका/तूर/ऊस इ.या मध्ये चवळी/ सोयाबीन इत्यादी पिकांची लागवड करणे.
 5. आच्छादनाचा वापर / mulch हे मातीच्या पृष्ठ भागावर असलेले संरक्षक कवच असते. मल्चिंग त्यांना गुदमरून टाकतात व त्यांची वाढ कमी होते.  मल्चिंग हे विघटनशील शेतातील कचऱ्याद्वारे किंवा प्लॅस्टिकशीटद्वारे केले जाऊ शकते. प्लॅस्टिकच्या बाबतीत काळा रंग सर्वात जास्त लोकप्रिय आहे. जो कि व्यावसायिक बागायती पिक उत्पादन करताना  विशेषत: तण नियंत्रणासाठी वापरला जातो. 
 6. सोलरायझेशन : भिजलेल्या शेती क्षेत्रावर  पारदर्शक पॉलिथीन आवरण झाकून सोलरायझेशन  केले जाते, त्यामुळे तापमानात ५ - १० अंश सेल्सिअसने वाढ होते.
 7.  stale seedbed : ह्या प्रकारात पेरणी साठी शेत तयार केलं जातं, पण त्यात पेरणी न करता तण उगवू दिले जाते. त्यानंतर तणांची कोवळी रोपे मारण्यासाठी तणनाशकाची फवारणी केली जाते. 
 8. blind tillage :पीक रोपांच्या उगवण्यापूर्वीच्या अवस्थेत किंवा वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना पेरणी किंवा लागवड केल्यानंतर (निर्जंतुक जमिनीत) केलेली मशागत म्हणजे पीक रोपांचे (ऊस, बटाटा इ.) नुकसान होणार नाही, परंतु, अतिरिक्त रोपे व रुंद पालेभाज्या आणि तण नांगरणी करून  उखडून टाकल्या जातात.   ह्या साठी तिफण वापरला जातो.
 9. पीक व्यवस्थापन पद्धती : जोमदार आणि तणांशी चांगल्या प्रकारे टक्कर देणारे व  वेगाने वाढणारे पीक वाण निवडणे. 

फायदे-

 • कमी किंमत 
 • अमलात आणणे सोपे जाते.
 • कमी तांत्रिक कौशल्य पुरेसे आहे.
 • पिकांचे नुकसान होणार नाही.
 • प्रभावी तण नियंत्रण

तोटे-

 •  वेळ घेणारा आणि अवघड 
 •  बारमाही आणि समस्याग्रस्त तण नियंत्रण अवघड जाते.


३) जैविक तण नियंत्रण :

तणांच्या नियंत्रणासाठी कीटक, रोगजंतू इत्यादी जैवघटक व इतर प्राण्यांचा वापर केला जातो. कीटक आणि रोगजंतू तणांचा प्रादुर्भाव करतात आणि ते एकतर वाढ कमी करतात किंवा तण मारतात. जैविक नियंत्रण पद्धतीमुळे तण कमी करता येते पण तणांचे निर्मूलन करणे शक्य होत नाही. उदा: ज्वारीत आंतरपीक म्हणून चवळी ची लागवड करतात. ज्यामुळे ज्वारीतील तणांची वाढ प्रभावीपणे कमी होते.


४) रासायनिक तण नियंत्रण :

तणनाशके हि तणांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायने आहेत.


फायदे-

 • प्रतिकूल माती आणि हवामानासाठी उपयुक्त 
 • तण उगवण्यापूर्वीच  वापरतात आणि शेत तणमुक्त करतात.
 • सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त लक्ष्यित तणांवरच नियंत्रण ठेवते
 • अनेक बारमाही तणांच्या प्रजातींवर नियंत्रण ठेवते
 • मजुरांच्या तुलनेत किफायतशीर


तोटे-

 • पर्यावरण प्रदूषित करते.
 • जमिनीवर परिणाम होतो.
 • तणनाशकाच्या प्रवाहाचा शेजारच्या शेतावर परिणाम होतो.
 • किमान तांत्रिक ज्ञान आवश्यक 
 • काही तणनाशके महाग असतात.
 • मिश्र व आंतरपीक पद्धती यासाठी योग्य तणनाशके उपलब्ध नाहीत. 


तर मित्रानो, कशी वाटली माहिती?? काही शंका असल्यास  कंमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि तुमच्या प्रतिक्रिया पण नोंदवा. धन्यवाद.  

  

 • Social Sharing
 • Like Facebook page to stay updated!

 • Recent Articles
 • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List