तण आणि त्यांचे प्रकार

| 15 Mar 2024 | 134 |

नमस्कार शेतकरी बंधुनो,

 आज आपण तण ह्या विषयावर माहिती घेणार आहोत.आपल्या पैकी बऱ्याच जणांना शेतात असणाऱ्या तण विषयी माहिती असेलच. तण हि अशी वनस्पती असतात, जी इच्छित नसताना उगवतात. तणांमुळे आपल्या पिकासाठी आवश्यक पाणी, मातीतील पोषक घटक, प्रकाश आणि जागा यांची विभागणी होते. तण हे 50 टक्के पर्यंतच्या प्रमाणात पीक उत्पादन कमी करतात. अंदाजे, पीक उत्पादनाच्या एक तृतीयांश भाग हा तणांसोबत स्पर्धा करण्यात जातो. वनस्पतींच्या २,५०,००० प्रजातींपैकी तणांच्या सुमारे २५० प्रजाती  कृषी व बिगरशेती व्यवस्थेत  ज्या प्रमुख आहेत, तर जागतिक परिस्थितीत सुमारे 30000 प्रजाती तण म्हणून वर्गीकृत आहेत 


तणांची वैशिष्ट्ये :

  • पिकांच्या च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बियाणे तयार करते. उदा.: ॲमरॅन्थस रेट्रोफ्लेक्सस(Amaranthus retroflexus) 1,96,405 बिया/वनस्पती तयार करतात, तर गहू आणि तांदूळ फक्त 90 ते 100 बिया/वनस्पती उत्पन्न करतात.
  • बहुतेक तणांच्या बिया आकाराने लहान असतात.
  • बियाणे सहज, सोप्या व वैविध्यपूर्ण प्रकारे पसरतात.
  • बिया लवकर उगवतात आणि वेगाने वाढतात
  • फुले लवकर येतात आणि पिकाच्या अगोदर परिपक्व होतात.
  • कठीण परिस्थितीत व हंगामात अंकुर वाढतात.
  • बिया दीर्घकाळ सुप्त असतात आणि योग्य हंगामात अंकुरतात.
  • अनेक वर्षे तग धरून राहतात.
  • अति ओलाव्या चा ताण सहन करतात.
  • मुळे  खूप मजबूत आणि सखोल असतात.


तणांमुळे पिकावर  होणारे खालील परिणाम लगेच दिसून येतात:

  • पिकाला पोषक तत्वांची कमतरता भासते.
  • वाढ कमी होते.
  • पाण्याची गरज अधिक असेल.
  • कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त असेल.
  • उत्पन्नावर परिणाम होतो.
  • उत्पादन खर्च वाढेल.


आता आपण तणांचे वर्गीकरण पाहुया. 

अ. जमिनीनुसार:


1.  वार्षिक तणे – आघाडा, कुर्डू,

    रब्बीतणे – वसंतवेल, रानपैजी 


2.  द्वैवार्षिक तणे – राणगाजर, राणकांदा


3.  बहुवार्षिक तणे – हरळी, लव्हाळा, कुंदा, रुई, घाणेरी


ब. ज्या ठिकाणी आढळतात त्यानुसार:


1.  पिकामधील तणे – टारफुला, रानओट, पाखड, बंबाखू, खंडकुळी, माठ, काटेमाठ, ओसाडी, तादुंळजा


2.  पडीक जमिनीतील तणे – रानबाभूळ, रानबोर, रुई


3.  कुरणातील तणे – गाजर गवत, पिवळी तिळवण


4.  कालवा, पाण्याचे पाट, डबके - लव्हाळा, माका, पाणकुंभी.


5.  रस्त्याच्या कडेला रेल्वेमार्ग – गाजरगवत, रूई टाकळा


क. जमीन प्रकारानुसार:


1.  हलक्या जमिनीतील तणे – आघाडा, चिमनचारा, कुर्डू, सराटा, गोखरु


2.  भारी जमिनीतील तणे – लव्हाळा, हरळी, कुंदा


3.  पाणथर तणे – पाणकणीस, लव्हाळा


ड. पानाच्या रुंदीनुसार व बियाच्या दलानुसार:


1.  एकदल तणे – अरुंद पानाची तणे, फांद्या नसलेली तणे, उदा. गवत चिमनतारा, हरळी


2.  द्विदल तणे – रुंद पानाची तसेच फांद्या असलेली तणे उदा. दुधनी, कांगाणी कई.



तर मित्रानो, कशी वाटली माहिती?? काही शंका असल्यास  कंमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि तुमच्या प्रतिक्रिया पण नोंदवा. धन्यवाद.  


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!


Back to Articles List