दुय्यम पोषक घटक व त्यांचे कार्य

| 11 Mar 2024 | 131 |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,


काही दिवसापूर्वी आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK)  बद्दल माहिती घेतली होती. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश यांची आपल्या पिकांना गरज असते त्याच प्रमाणे सूक्ष्म पोषक घटक पिकांना गरजेचे असतात.  सूक्ष्म पोषक घटक संतुलित पिक पोषण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतात. पण या पोषक घटकांची गरज खूप कमी प्रमाणात असते म्हणून त्याला सूक्ष्म पोषक घटक असे म्हणतात.

    एकंदरीत जर पहिलं तर १६ पोषक घटक असतात. त्यामध्ये १३ अन्नद्रव्य जमिनीतून घेतली जातात. तर ३ हवा आणि पाण्यातून मिळतात. नेहमी आपण जो आपल्या पिकांना खतांचा पुरवठा करतो त्यातून नत्र, स्फुरद, आणि पालाश त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक मिळत असतात. खाली दिल्या प्रमाणे १६ पोषक घटकांची वर्गवारी करण्यात अली आहे.


हवा आणि पाण्याद्वारे मिळणारे घटक : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन

महत्वाचे पोषक: नायट्रोजन(N), फॉस्फोरस(P), पोटॅशियम(K) [याची माहिती आपण काही दिवसांपूर्वी घेतली आहे ]

माध्यमिक पोषक: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर

सूक्ष्मपोषक: बोरॉन (boron - B), क्लोरीन (chlorine - Cl), तांबे (copper - Cu), लोहा (iron - Fe), मॅगनीज (manganese - Mn), मोलिबडेनम (molybdenum  - Mo) आणि जस्त (zinc - Zn).


तर आज आपण मॅक्रो नुट्रीएंट्स(secondary nutrients) म्हणजेच दुय्यम माध्यमिक पोषक घटकांची माहिती पाहणार आहोत. म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यांची माहिती घेणार आहोत. तर चला पाहुया.


कॅल्शियम:


पिकातील पेशी विभाजनात आणि पेशी लांब होण्यात कॅल्शियम गरजेचे आहे. कॅल्शियम हे पेशी भित्तिकेचा घटक असल्याने पेशीची लवचिकता ही कॅल्शियमवर अवलंबुन असते. पेशी भित्तिका तयार होण्यात कॅल्शियम गरजेचे असते. कॅल्शियम मुळे पेशी भित्तिकेस टणकपणा येतो, जे पेशी लांब होण्यात उपयोगी ठरत नाही. कॅल्शियम फुला, फळांची गळ थांबविण्यात देखिल मदत करते. कॅल्शियम पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी जरी मदत करित नसले तरी ते मुळांच्या वाढीसाठी मदत करते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फळांत पाण्याचे प्रमाण जास्त वाढते. कॅल्शियम पोटॅश ने तयार केलेल्या स्टार्च च्या वापरात गरजेचे असल्याने असे होत असेल. ज्या जमिनीत कॅल्शियम भरपुर आहे अशा जमिनीत मुक्त कॅल्शियम असेलच असे होत नाही, त्यामुळे पिकांस कॅल्शियम चा पुरवठा करणे गरजेचे ठरते, मात्र अशा वेळेस फवारणीतुन गरज पुर्ण करणे फायदेशिर ठरते.


मॅग्नेशियम :

जमिनीत पालाश आणि मॅग्नेशियम यांची पिकात शिरण्यासाठी मोठी स्पर्धा चालते, ज्यामुळे पिकास मॅग्नेशियम ची कमतरता जाणवते. मॅग्नेशियम शिफारस करित असतांना जमिनीतील पालाश ची मात्रा देखिल माहीत असणे गरजेचे आहे. मॅग्नेशियम दिलेले असल्यास स्फुरद ची उपलब्धता वाढते, मात्र स्फुरद व मॅग्नेशियम युक्त विद्राव्य खते एकत्र दिल्यास त्यांचे स्थिरिकरण होते. मॅग्नेशियम दिल्यानंतर सल्फर चे लिचिंग (जमिनीत वाहुन जाणे) वाढते. मॅग्नेशियम सर्वच पिकांसाठी गरजेचे असले तरी देखिल कोबी, फुलकोबी, कापुस, काकडी, वांगी, बटाटा, पालक, तंबाखु, टोमॅटो व खरबुज पिकांस अतिरिक्त मॅग्नेशियम दिल्यास चांगला प्रतिसाद देतात. पिकातील हरितलवक निर्मितीसाठी गरजेचे अन्नद्रव्य आहे. मॅग्नेशियम हरितलवकाचा घटक देखिल आहे. मॅग्नेशियम पिकात प्रकाश संश्लेषण क्रियेत गरजेचे आहे. पिकाच्या पानांनी तयार केलेले अन्नद्रव्य, ज्या ठिकाणी, म्हणजे मुळांमधे, कंदात तसेच दाण्यांमधे साठवले जाते यांच्यावर मॅग्नेशियम कमतरतेमुळे विपरित परिणाम होतो. पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी देखिल मॅग्नेशियम गरजेचे आहे. पिक मॅग्नेशियम रुट इंटरसेप्शन (एक्टिव ट्रान्सपोर्ट) पध्दतीने शोषुन घेते. मॅग्नेशियम पिकातील फॉस्फोरसच्या वहनासाठी देखिल गरजेचे आहे. मॅग्नेशियम पिकात साखर निर्मितीत गरजेचे आहे, तर स्टार्च च्या वहनात देखिल महत्वाचे आहे. पिकांत फॅट (मेद) व तेल तयार होण्यात मॅग्नेशियम गरजेचे असते.


  • पिकातील फेरसच्या वापरासाठी मॅग्नेशियम गरजेचे आहे.
  • ज्या पिकांच्या मुळांवर नत्र स्थिर करणा-या गाठी तयार होतात, त्यागाठी तयार होण्यात मॅग्नेशियम मदत करते.
  • मातीचा कमी सामु असल्यास मॅग्नेशियम ची उपलब्धता कमी होते, तर जास्त सामु असल्यास ती वाढते.
  • जमिनीत जास्त प्रमाणात मँगनीज असल्यास मॅग्नेशियम ची सामू कमी झाल्याने उपलब्धता कमी होते.
  • ज्या जमिनीत पालाश व कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते तेथे मॅग्नेशियम ची कमतरता जाणवते.


सल्फर :

सल्फर सामु कमी करण्याच्या व्यतिरिक्त देखिल पिकासाठी फार महत्वाची भुमिका पार पाडत असते. सल्फर हे प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेचे आहे तसेत ते काही अँमिनो अँसिड चा घटक असते. नत्राचे रुपातंर प्रथिनांत होण्यासाठी गरजेचे आहे हरितलवक निर्मितीत ते उत्तेजक म्हणुन कार्य करते. पिकांती खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्ती साठी गरजेचे आहे. ज्या पिकांच्या मुळांवर उपयुक्त गाठी तयार होतात त्यांच्या निर्मितीसाठी गरजेचे आहे. ज्यावेळेस पिकांस वरिल फायद्यांसाठी सल्फर द्यावयाचे आहे त्यावेळेस ते सल्फेट स्वरुपात देणे फायदेशिर ठरते. शिवाय ज्यावेळेस तात्काळ परिणाम हवा असेल त्यावेळेस देखिल सल्फेट स्वरुपातील खतांचा वापर हा फायदेशिर ठरतो.


 मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List