शेती म्हणजे काय?

| 20 Jul 2023 | 2244 |

Agriculture हा शब्द  ager किंवा agri म्हणजे "माती" आणि cultura म्हणजे "लागवड" दोन लॅटिन शब्दांवरून आला आहे. शेती ही एक कला, विज्ञान व आर्थिक कारणांसाठी पिके आणि पशुधन उत्पादन करण्याचा व्यवसाय म्हणून परिभाषित केली जाते.

एक कला म्हणून शेती हि कुशल रीतीने शेती करण्याच्या पद्धतीचे ज्ञान आत्मसात करते, परंतु त्याकरीता  शेती करण्यासाठी लागणारी नियम व तत्वे समजून घेणे आवश्यक नाही.   

विज्ञान म्हणून शेती हि वैज्ञानिक तत्त्वांवर विकसित सर्व तंत्रज्ञान उदा पीक प्रजनन, उत्पादन तंत्र, पीक संरक्षण, अर्थशास्त्र इ. यांचा  उत्पन्न आणि नफा वाढवण्यासाठी उपयोग करतात. उदा. संकरीकरणाद्वारे नवीन पिके आणि वाण विकसित करणे, कीटक आणि रोग प्रतिरोधक  ट्रान्सजेनिक पीक वाण, प्रत्येक पिकातील संकरित जाती, उच्च खतांना प्रतिसाद देणारे वाण, पाणी व्यवस्थापन,तण नियंत्रणासाठी तणनाशके, कीटक आणि रोगांचा सामना करण्यासाठी जैव-नियंत्रण एजंट्सचा वापर  करणे इ. 

व्यवसाय म्हणून :

जोपर्यंत शेती हा ग्रामीण जनतेचा जीवन जगण्यासाठी मार्ग असेल, तोपर्यंत शेती उत्पादन हे प्राथमिक गरज भागवण्यासाठी उपयोग केला जाईल. परंतु, शेती ही शेत मजूर, पाणी आणि भांडवल यांचे व्यवस्थापन करून आणि  अन्न, खाद्य, फायबर आणि इंधनाचे उत्पादन या साठी विविध विज्ञानांचे ज्ञान वापरून जास्तीत जास्त निव्वळ परतावा मिळवण्यासाठी केली जाते. अलीकडच्या काळात, व्यवसाय म्हणून यांत्रिकीकरणाद्वारे  शेतीचे व्यापारीकरण केले जाते.


 कृषी अधिनियम (1947) नुसार  शेतीची व्याख्या  मध्ये 

१. फलोत्पादन, फळवाढ, बियाणे वाढवणे, दुग्धव्यवसाय आणि पशुधन प्रजनन आणि पालन

२. चर  जमीन, कुरणाची जमीन, विकर जमीन, बाजार बाग आणि रोपवाटिका म्हणून जमिनीचा वापर करणे  

३.  शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी जंगल म्हणून जमिनीचा वापर करणे 

या सर्वांचा समावेश केला जातो.


शेती ही निसर्गात  जैविक समतोल राखते.

समाधानकारक कृषी उत्पादन हे अविश्वास, मतभेद आणि अराजकता दूर करून राष्ट्राच्या व्यक्तींना शांतता, समृद्धी, सौहार्द, आरोग्य आणि संपत्ती आणते.

शेती विविध जाती आणि समुदायांचा समावेश असलेल्या समाजाला चांगले सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक जीवन उन्नत करण्यास मदत करते.


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List