हायड्रोपोनिक शेती

| 07 Feb 2023 | 810 |

नमस्कार मित्रांनो,

        जस जसा काळ बदलत राहील तसे प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येतात. नवीन तंत्रज्ञान मुळे मनुष्य नवी उंची गाठत आहे. तंत्रज्ञानचा वापर करून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रात वेळोवेळी बदल घडून आले. त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीत बदल करून तंत्र ज्ञानाचा उपयोग करणे हि काळाची गरज आहे. म्हणून शेतकरी बंधू सुद्धा आता नवीन प्रणाली अंमलात आणून भरघोस व आरोग्यदायी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पारंपरिक शेती म्हणाल तर डोळ्यासमोर येते ती काळी सुपीक जमीन, पाणी व सोबत मुकी जनावरे. या गोष्टीना छेद देत आता शेतकरी बंधू घराच्या अंगणात किंवा गच्चीवर शेती करत आहेत. हे नवे तंत्रज्ञान आहे हायड्रोपोनिक्स (Hydroponics) शेती. अल्प प्रमाणात असलेली शेती व माती मुळे होणारे आजार, हवामान बदल यावर उपाय म्हणून हायड्रोपोनिक्स शेतीकडे पहिले जाते. तर चला पाहूया ह्या नव्या शेती बद्दल.


हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय?

मातिविना शेती. आता माती नाही जमीन नाही तर करायचे कसे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, माती न वापरता शेती किंवा कुठलं झाड तरी लावता येत का? तर हो, हे शक्य आहे. कारण झाड जगवायला मातीची आवश्यकता नसून त्याला पोषक घटकांची (नुट्रीएंट्स ) आवश्यकता असते. आणि ते घटक झाडाला दुसऱ्या माध्यमातून जरी मिळाले, तरी भरघोस उत्पादन घेता येते. या पद्धतीच्या शेतीचा फायदा असा की, याला मातीची म्हणजेच जागेची जास्त आवश्यकता नसते. हायड्रोपोनिक्स ही वनस्पती, सहसा पिके, मातीशिवाय वाढवण्याची पद्धत आहे.तर ह्या पद्धतीत, आवश्यक पोषक तत्वांनी भरपूर पिके/वनस्पती पाण्यावर वाढतात. परंतु पिकांना आधार साठी एका माध्यमाची गरज असते. त्यासाठी कोकोपीट, वर्मी क्युलाईट,परलाईट व रॉकवूल ह्या माध्यमाचा उपयोग केला जातो. जसे पारंपरिक शेती करताना पिकांना आवश्यक असणारी नुट्रीएंट्स जमिनीत उपलब्ध असतात. तसे हे नुट्रीएंट्स माध्यमात उपलब्ध नसतात. म्हणून नुट्रीएंट्स पाण्यामध्ये विरघळवले जातात व पाण्याद्वारे माध्यम मध्ये सोडले जातात. तर अशा प्रकारे हे माध्यम नुट्रीएंट्स पकडून ठेवतात. म्हणजेच पाणी व माध्यम मिळून झाडांच्या  मुळांना नुट्रीएंट्स पुरवतात.

    अभ्यासानुसार, हायड्रोपोनिक पद्धतीने उगवलेली झाडे जमिनीतील वनस्पतींपेक्षा जलद आणि निरोगी वाढतात कारण त्यांना आवश्यक पोषक तत्त्वे थेट त्यांच्या मुळांपर्यंत पाण्याद्वारे पुरवली जातात.

हायड्रोपोनिक शेतीचे फायदे:

 • या तंत्रामध्ये जमिनीचे प्रमाण मर्यादित असलेल्या किंवा प्रदूषित माती किंवा मातीची उपलब्धता च नाही अशा स्थितीमध्ये हायड्रोपोनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. 
 • जागेचा कार्यक्षम वापर करता येतो. 
 • वातावरणातील तापमान, आद्रता आणि प्रकाशाची तीव्रता यांचे आवश्यक प्रमाण ठेवले जाते. परिणामी वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते.
 • जमिनीवर वाढवलेल्या पिकांच्या तुलनेमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीमध्ये पिकांची वाढ केवळ दहा टक्के पाण्यामध्ये करणे शक्य होते. या पद्धतीमध्ये पोषक पाण्याचा पुनर्वापर होतो. वाळवंटी तसेच दुष्काळी पट्ट्यामध्य ही पद्धत उपयुक्त ठरते. 
 • पाण्यामध्ये पोषक खनिजे कृत्रिमरित्या पिकांसाठी मिसळली जातात. मातीच्या तुलनेत या पाण्याचा पीएच अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवता येतो. त्याचा परिणाम असा होतो की पिकाद्वारे पोषक अन्नद्रव्यांचे अधिक शोषण होऊन अधिक वाढ होते. मातीतील पिकांच्या तुलनेमध्ये 50 टक्क्यांपर्यंत अधिक वेगाने वाढ होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
 • हायड्रोपोनिक्स मध्ये तने, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही किंवा मर्यादित राहतो मशागत, आंतर मशागत, सिंचन, खुरपणी अशी कामे करावी लागत नाही. 
 • परिणामी वेळेची आणि मजुरांची बचत होते. कमीत कमी जागेत होते जागेमध्ये नियंत्रित पद्धती व भरपूर पोषक घटकांच्या उपलब्धतेमुळे भाज्यांचे भरघोस उत्पादन घेता येते.


 मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!


  

 • Social Sharing
 • Like Facebook page to stay updated!

 • Recent Articles
 • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List