विविध कृषी पुरस्कार - उद्देश व स्वरुप - महाराष्ट्र राज्य

| 05 May 2022 | 1770 |

नमस्कार मित्रानो

           नुकताच २ मे रोजी नाशिक येथे महाराष्ट्र सरकार च्या वतीने कृषी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ह्या वितरण सोहळ्यात कृषी क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषि विविध  पुरस्कार'' देण्यात येतात. तर आज आपण कृषी पुरस्कारांचे प्रकार व त्यांची माहिती जाणून घेणार आहोत.


1. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

ह्या पुरस्काराची सुरुवात  सन 2000-२००१ ला झाली. दरवर्षी फक्त १ च पुरस्कार दिला जातो. कृषि क्षेत्रातील कृषि विस्तार, कृषि प्रक्रीया, निर्यात, कृषि उत्पादन, पीक फेरबदल, कृषि उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मध्ये अति उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती/संस्था/गटास हा पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येकी रक्कम रुपये 75,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.


2. वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार

 ह्या पुरस्काराची सुरुवात  सन 1984  ला झाली. दरवर्षी 10 पुरस्कार दिले जातात . कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विकास, फलोत्पादन व ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-या शेतकरी / संस्था/ गटांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी रक्कम रुपये 50,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार  असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.


3. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार

 ह्या पुरस्काराची सुरुवात  सन 1995  ला झाली. एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या 5 इतकी आहे. शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता जिजामाता कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राज्यातुन दरवर्षी पाच (५) महिला शेतक-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख आणि स्मृतीचिन्ह, तसेच पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या महिला शेतक-यांस हा पुरस्कार देण्यात येतो.


4. सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार 

ह्या पुरस्काराची सुरुवात  सन 2009  ला झाली. एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या  ( राज्यातून एक संस्था व प्रत्येक विभागातून १ शेतकरी याप्रमाणे )०९  इतकी आहे. सेंद्रिय शेतीमध्ये अव्दितीय कार्य करणा-या शेतकरी / संस्था/गटांना सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी रक्कम रुपये ५०,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.


5. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

हा पुरस्कार सन 1994 सालापासुन दिला जातो.  एकुण द्यावयाची पुरस्कार संख्या 3 इतकी आहे. जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक्य-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वत: शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वत:ची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना/ व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा्य-या महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रत्येकी रक्कम रुपये 30,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, सपत्नीक सत्कार  असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.


6. वसंतराव नाईक शेतिनीष्ठ शेतकरी पुरस्कार 

हा पुरस्कार सन १९६७ सालापासुन दिला जातो. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादीमधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, निलगिरी, सुबाभ्‌ुळ इत्यादींची लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व जवळपास शेतक-­यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, शासन / सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे, इत्यादी निकषांतर्गत शेतीमध्ये शेतक­-यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक­-यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व प्रत्येकी रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.


7. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषि सेवारत्न पुरस्कार

हा पुरस्कार सन 2014 सालापासुन दिला जातो. राज्यातील शेतीविषयक उत्पन्न वाढविण्याच्या द्दष्टीने महत्वाचे व मोलाचे कार्य करणा­या विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचा­यांमधील एका अतिउत्कृष्ट अधिकारी व कर्मचा­यास राज्यशासनाव्दारे प्रतीवर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविणेत येणार आहे. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्कार  असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.


8. उद्यान पंडित पुरस्कार

फलोत्पादन क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी यांना हा पुरस्कार देण्यात येतो. रु. 25000/-चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे  पुरस्कार संख्या-8  (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)  


9. युवा शेतकरी पुरस्कार

रु. 30000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह(ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यातून दरवर्षी देण्यात येणारे  पुरस्कार संख्या-8  (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)  प्रस्ताव सादर करतेवेळी शेतकरी यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे.   


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List