खत व्यवस्थापन आणि मिश्र खते

| 31 Mar 2022 | 2834 |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

शेती करण्यासाठी खतांचा वापर हा महत्वाचा घटक आहे. खतांचा योग्य प्रमाणात वापर करून आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. सर्वांना रासायनिक खतांची नावे माहित असतात पण त्यांचा कोणत्या पिकांसाठी किती प्रमाणात खतांचा वापर करावा, याचे ज्ञान असणे आवश्यक असते. वेगवेगळ्या खतांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश असतात. जर आपल्याला मिश्र खते करायची असतील तर त्याचे प्रमाण सुद्धा माहित असणे आवश्यक असते. तर चला पाहूया, घरीच मिश्र खते कशी बनयायची तेही किफायतशीर क़ीमतीत.


●सरळ खतात खालील प्रमाणे अन्नद्रव्य असतात

1. युरिया मधे ४६ % नत्र,

2. सिंगल सुपर फोस्फेट (SSP) मधे १६% स्फुरद 

3. म्युरेट ऑफ पोटॅश मधे ४९.८ % पालाश 


१. युरिया मधे ४६ % नत्र(N) असते. त्यामुळे ४६  किलो नत्र/हेक्टर पुरवठा करण्यासाठी १00 किलो युरिया आवश्यक आहे (४६/१०० =०.४६ नत्र). म्हणून १२० किलो नत्र/हेक्टर पुरवठा करण्यासाठी १०० * १२०  /४६= २६०.९  किंवा २६१ किलो युरिया आवश्यक आहे.

२. सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये १६% P2O5 (Phosphorus pentoxide) असते. त्यातून स्फुरद (P)  मिळवण्यासाठी खालील समीकरण वापरावे.

% P = %P2O5 X  0.४४

Kg P = kg P2O5 X 0.४४

म्हणजेच  १६ X 0.४४ = ७.०४ किलो इतके स्फुरद मिळेल. म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये ७.०४ इतके स्फुरद असते. म्हणजेच, ६० किलो स्फुरद /हेक्टर पुरवठा करण्यासाठी १०० *६० / ७.०४ =८५२.२७ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आवश्यक आहे.

३. म्युरेट ऑफ पोटॅशमधे ६०% K2Oअसते. त्याप्रमाणे   म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये ४९.८ पालाश (K) असते. म्हणून ४० किलो पालाश पुरवठा करण्यासाठी

१००  * ४० /४९.८= ८०.३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश आवश्यक आहे.


त्यामुळे माती परीक्षण व खत विश्लेषण नुसार खतांची मात्रा मोजली जाते. 

अत आपण, पोषक घटकांच्या खर्चाची तुलना पाहूया.

उदा. 

१. ४६% N सह युरियाची किंमत रु.५६२.२० प्रति १०० किलो आहे.

२. २० % N सह अमोनियम सल्फेटची किंमत रु.१०२९ प्रति १०० किलो आहे.

प्रत्येक १०० किलो युरियामध्ये  46 kg नत्र असते.म्हणून युरियामध्ये ५६२.२/४६= रु. १२.२२ प्रति किलो नत्र मिळते . प्रत्येक १०० किलो अमोनियम सल्फेटमध्ये २०.६% नत्र आणि २४% स्फुरद असते.म्हणून अमोनियम सल्फेटमधील १०२९/२०.६ = रु.४९.९५ प्रति किलो नत्र मिळते. अशा प्रकारे, नायट्रोजन हे युरिया पेक्षा  स्वस्त आहे . तरीही, अमोनियम सल्फेट मध्ये २४ % सल्फर  देखील आहे. म्हणून, सल्फरची कमतरता असलेल्या मातीसाठी, अमोनियम सल्फेट हा एक चांगला पर्याय आहे. तसेच, सामान्य सल्फर पातळी साठी युरिया हा चांगला पर्याय आहे.

उदा. २ 

७ % P सह सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) ची किंमत  ४८० रुपये प्रति १०० किलो असते.

डी - अमोनियम फॉस्फेट (डीएपी) २० % Pआणि १८ % N ची किंमत रु. १५९६ प्रति १०० किलो आहे. SSP मध्ये ७ % स्फुरद आहे म्हणजेच प्रत्येक १०० किलो SSP मध्ये ७ किलो स्फुरद आहे. त्यामुळेSSP मध्ये प्रति किलो P: ४८०/७ = रु.६८.५७ इतके असेल. तर, DAP मध्ये २० % स्फुरद  आणि १८ % नत्र असते, म्हणजे प्रत्येक १०० किलो डीएपीमध्ये २० kg स्फुरद आणि  १८ किलो नत्र मिळेल. १०० किलो डीएपीमध्ये नत्र ची किंमत रु २१९.९६ 219.९६ होईल . म्हणून DAP मधील स्फुरद ची किंमत : (१५९६ – २१९.९६ = १३७६); म्हणजे १३७६/२०  = रु.६८.८० प्रति किलो स्फुरद असेल.अशा प्रकारे, दोन्ही खतांमध्ये प्रति किलो स्फुरद ची  किंमत समान आहे. तरीही, DAP मध्ये १८ % नत्र  आहे. म्हणून, नत्र आवश्यकता असलेल्या मातीत, डीएपी ची निवड करणे अधिक चांगले होईल.


तर अशा प्रकारे आपण योग्य खर्चात योग्य प्रमाणात खते वापरून भरघोस उत्पन्न घेऊया. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कलावा.

धन्यवाद.


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List