सिंचन पद्धति

| 29 Mar 2022 | 5015 |

नमस्कार मित्रांनो,

रोपांच्या/ पिकांच्या वाढीसाठी पुरेसा पाणीपुरवठा अतिशय महत्वाचा आहे. शेत जमिनीला कृत्रिमरीत्या पाणी देण्याच्या पद्धतीला पाणीपुरवठा असे म्हणतात. जेव्हा पाऊस पुरेसा नसतो, तेव्हा

वनस्पतींना /पिकांना  सिंचनापासून अतिरिक्त पाणी मिळणे आवश्यक आहे. तर आज आपण पाणी सिंचन व त्याचे प्रकार पाहणार आहोत. शेतातील पिकास पाणीपुरवठा करणाऱ्या पद्धतींना  जलसिंचन पद्धती  असे म्हणतात . जलसिंचन  पद्धतीची निवड  करत असतांना शेताचा उतार, मातीचा प्रकार, पोत, जलधारण क्षमता, हवामान, पिकांच्या मुळाची खोली, त्यांचे गुणधर्म, त्याच्या वाढीची अवस्था, भांडवलाची उपलब्धता, पान्याची उपलब्धता, गुणवत्ता  इ. बाबी विचारात घेणे आवश्याक असते. जमिनीचा  उतार ०.०६ टक्क्यापेक्षा  कमी अस¨यास सारा पद्धतीने,  ,०.१ टक्के उत्तरापर्यंत वाफे पद्धतीने पाणी दिले जाते.भारी जमिनी मध्ये सारी- वरंबा पद्धतीने पाणी देणे लाभदायक ठरते. जयास्तुतर असणाऱ्या ठिकाणी साऱ्या पडून पाणी दिले जाते. पाण्याची कमतरता असेल्या प्रदेशात ठिबक किंवा तुषार जलसिंचन पद्धती उपयोगात आणल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते.


आता पाहूया शेत पर्यंत पाणी आणण्याच्या पद्धती --


१. प्रवाही सिंचन- (Flow Irrigation) - जेव्हा जास्त उंच भागावरून पाणी सकाळ/ कमी उंचीच्या भागाकडे(गुरुत्वाकर्षण शक्तीस अनुसरून ) प्रवाह स्वरूपात वाहून आणले जाते. व शेतीला दिले जाते. उदा. नाला, कालवा, चारी इ, द्वारे होणारे सिंचन. ह्यात यंत्र किंवा विजेची गरज नसते.


२. उपसा सिंचन( Lift Irrigation) - ह्यात पाणी सखल किंवा खोल भागाकडून उंच भागाकडे पंप किंवा अन्य साधनांनी वाहून आणले जाते. उदा. पंप, रहाट, मोट इ. ह्यात पंप अथवा ऊर्जेची गरज नसते. हि वेळखाऊ व खर्चिक पद्धत आहे.


आता पाहूया शेतातील पिकांपर्यंत पाणी वितरित करण्याच्या पद्धती --

शेतात पिकांना पाणी मुख्यतः तीन प्रकारे देता येते.

१. जमिनीच्या पृष्ठ भागावरून  

२. जमिनीच्या पृष्ठ भागाखालून

३. जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर थोड्या उंची वरून फवाऱ्याच्या अथवा पावसासारखा धारांच्या रूपाने


 त्यानुसार पाणी वितरित करण्याचे २ मुख्य गट केले जातात.

१. पारंपरिक / पृष्ठीय जलसिंचन पध्दती (Traditional / Surface irrigation)

२. आधुनिक जलसिंचन पध्दती (Modern irrigation)


तर चला पाहूया पारंपरिक / पृष्ठीय जलसिंचन पध्दती-

जेव्हा पिकांना प्रवाहाच्या स्वरूपात पाणी दिले जाते त्यास  पृष्ठीय जलसिंचन पध्दती असे म्हणतात. हि सर्वात प्राचीन व स्वस्त पध्दती आहे, त्यामुळे बहुतांश अविकसित व विकसनशील देशातील शेतकरी हि पद्धत अवलंबतात. शेताचा आकार, उतार, मृदा प्रकार, पाणी उपलब्धता याच्या आधारावर योग्य त्या पृष्ठीय जलसिंचन चा वापर केला जातो.

पारंपरिक / पृष्ठीय जलसिंचन पध्दती चे खालील उप प्रकार आहेत.

१.१  मोकाट / पुरसिंचन (Flood Irrigation) -

१.२ सरी (अरुंद नाली) सिंचन (Furrow Irrigation )

१.३ सारा सिंचन (Border Strip Irrigation)

१.४  वाफा सिंचन (Check Flooding)

आता आपण सर्व उप प्रकारांची माहिती घेऊ.

१.१.  मोकाट / पुरसिंचन (Flood Irrigation) - हि जलसिंचनाची सर्वात जुनी पद्धत आहे. ह्यात शेतातील जमिनीची कोणत्याही प्रकारे बांधणी न घालता मुक्तपणे शेताच्या उंच भागावर पाटाच्या साहाय्याने पाणी  सोडले जाते. हे पाणी उताराच्या दिशेने वाहत असल्याने शेतात सर्वत्र सारख्या प्रमाणात मुरात नाही. ज्या ठिकाणी पाणी जात प्रमाणात साचते, तेथील पिकांची मुले कुजतात. परिणामी पिकांची वाढ खुंटते. तसेच उंच सखल भागात पाणी कमी साचल्याने पिके वाळतात. त्यामुळे उत्पादनात घट होते. भारतात या पद्धतीचा सर्वाधिक वापर केला जातो.

१.२. सरी (अरुंद नाली) सिंचन (Furrow Irrigation) - 

शेतात नांगराच्या साहाय्याने तयार केलेल्या सऱ्यांमधूनपाणी दिले जाते. ह्या पद्धतीत जमीन जितकी सॅम पातळीत असेल तेवढे फायदेशीर ठरते. साऱ्यांची खोली ८ ते ३० सेमी व लांबी ४०० मीटरपर्यंत असू शकते. 

१.३ सारा सिंचन (Border Strip Irrigation)-

या पद्धतीत शेताचे उभे किंवा आडवे असे लहान-लहान सारे (पट्टे) तयार करून पाण्याचे वितरण केले जाते.

 ह्या साऱ्यांची लांबी रुंदी ठरवताना पाण्याचा प्रवाह, पाणी पुरवठ्या चा दर, जमिनीचा उतार, मृदेचा प्रकार ह्यांचा एकत्रित पणे विचार केला जातो. ०.२ ते ०.६ टक्के उतार असलेल्या जमिनीत २ ते ३ मी रुंद व ४० ते ६० मी लांबीचे सारे पाडतात. साऱ्याची रुंदी ३ ते १५ मीटर व लांबी ५० ते ४०० मीटर पर्यंत ठेवता येते.

१.४. वाफा सिंचन ( Check  Flooding ) - या पद्धतीमध्ये शेताचे लहान- लहान आकाराच्या संपातळीच्या तुकड्यांमध्ये बांध किंवा वरंबे तयार करून विभाजन केले जाते. त्या तुकडयांना वाफे असे म्हणतात. अशा वाफ्यांमध्ये पिकांची लागवड करून आवश्यकतेप्रमाणे पाणी भरले जाते. सामन्यतः वाफे समतल व ५ते १० मी लांबी रुंदीचे असतात. तसेच टायचे बांध सुमारे २५ ते ३० सेमी उंच व पायथ्यालगत ३० ते ६० सेमी रुंद असतात. त्यामुळे शेतीच्या कार्यात यंत्र सामुग्रीस अडथळा येत नाही. वाफ्याचा आकार हा पीक प्रकार, मृदा प्रकार व जमिनीचा उतार ह्या नुसार लहान - मोठा ठेवला जातो.  जमिणीचा उत्तर ०.६ % पेक्षा कमी असल्यास  २ते ४ मी रुंदी आणि ४ ते ६ मी लांबी चे वाफे तयार करतात.

आता आपण पाहूया आधुनिक जलसिंचन पद्धती

२. आधुनिक जलसिंचन पध्दती (Modern irrigation) -  कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेनासाठी शास्त्रीय जलसिंचन पद्धती वापरल्या जातात, त्यास आधुनिक जलसिंचन पध्दती (Modern irrigation) म्हणतात. 

पारंपरिक जलसिंचन पद्धतीमुळे पाण्याचा सुयोग्य वापर होत नसल्याने पिकांची चांगली वाढ होत नाही, उत्पादनात घट होते. ह्या पद्धतीत पाण्याची बचत होऊन जमिनी क्षारयुक्त होण्यापासून वाचवता येते. . जमिनीची सुपीकता वाढते व उत्पादनात वाढ होते.

आधुनिक जलसिंचन पध्दती (Modern irrigation) चे २ उपप्रकार आहेत.

२.१. तुषार सिचन (Sprinkler Irrigation )

२.२. ठिबक सिंचन (Drip Irrigation )

२.१. तुषार सिचन (Sprinkler Irrigation ) - कमी पाणी वापरून जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पिकांना फवाऱ्यासारखे किंवा पावसाच्या थेंबासारखे पाणी दिले जाते म्हणून यास तुषार सिचन (Sprinkler Irrigation ) म्हणतात. शेतात ठराविक अंतरावर pvc  पाईप टाकली जातात व त्यावर विशिष्ट अंतर ठेवून उभे पाईप जोडली जाते. या उभ्या पाईपच्या तोंडावर नोझल बसवितात. या द्वारे सभोवतालच्या पिकांवर चक्राकार दिशेने तुषार स्वरूपात पाणी उडविले जाते.

२.२. ठिबक सिंचन (Drip Irrigation ) - रोपांच्या मुळाशी थेंबा - थेंबाने पाणी देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात. जमिनीत पाणी जिरण्याची वेगापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते.पाणी देताना ते प्रथम गाळून घ्यावे लागते. त्यासाठी फिल्टर व pressure valve बसवितात. पॉलिथिन च्या पाईप वर थोड्या अंतरावर १ -१ तोटी बसवतात. त्याद्वारे पिकाच्या मुळाशी पाणी पडेल अशी सोय केली जाते.

मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 1


Back to Articles List