जमीन/शेती ची मोजणी करा मोबाईल वर २ मिनटात

| 29 Mar 2022 | 963 |


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

        जमीन किंवा शेती ची मोजणी करण्यासाठी आधी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागायचे. पण आता तंत्रज्ञानाच्या कृपेने ती सुद्धा गरज उरली नाही. जीपीएस (GPS) तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण मोबाइल वरून शेतीची मोज मापणी करू शकता. तर चला पाहूया, जमिनीची मोजणी कशी करावी. तर सर्व प्रथम आपण गूगल प्ले स्टोअर वर जाऊन जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर सर्च करावा लागेल. हे app  डाउनलोड केल्यानंतर लोकेशन व मीडिया फाईल साठी परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर स्क्रीन वर गूगल मॅप येईल. त्या वर निळ्या रंगाचा आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करून एरिया (Area) हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला २ पर्याय दिसतील.

१.  Measuring  By Walking

२. Measuring  By Manual

        पहिल्या पर्यायाद्वारे आपण बांधावरून चालत आपल्या जमिनीला वेढा घालून संपूर्ण मोजणी करू शकता तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपण गुगल मॅप मध्ये आपल्या जमिनीच्या (farm area) बांधावर जमिनीची हद्द सिलेक्ट करून जमिनीची मोजणी करू शकता. आपण आपल्या जमिनीचे आकारमान (area) गुंठा, हेक्टर अथवा एकर मध्ये पाहू शकता.


तर मित्रांनो, आपण अगदी सोप्या पद्धतीने मोबाइल वर आपली शेत जमीन मोजू शकता. ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया कळवा.


धन्यवाद.


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List