सोयाबीन पिकाची लागवड अणि माहिती

| 07 Apr 2023 | 1280 |नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण सोयाबेन पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत. सोयाबीन हे प्रोटीनचे माध्यम, जनावरांची पेंड, सोया मिल्क आणि प्रामुख्याने खाद्यतेलासाठी जागतिक स्थरावर वापर होत असल्याने नेहमीच मागणी जास्त असते. कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणार नगदी पीक म्हणून सोयाबीणाकडे पहिले जाते. महाराष्ट्रात ऊस पट्यात पीक फेरपालट म्हणूनही सोयाबीन पिकाकडे पहिले जाते.


जमीन

 साधारणतः मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड केली जाते . सोयाबीन लागवडीच्या जमिनीचा PH ६ ते ६.५ च्या आसपास असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक अधिक उत्तम येते. सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ व सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, म्हणून खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते. त्यामुळे पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सें.मी.पेक्षा अधिक खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पेरणी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी.


हवामान-  

सोयाबीन पिकास उष्ण हवामान आणि तापमान साधारणतः १८ ते ३५ अंश से.ग्रे. या पिकास अनुकूल ठरते आणि पिकाची वाढ चांगली होते. सोयाबीन पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पावसाची गरज असते.


पूर्वमशागत -

पेरणीपूर्वी जमीन खोल नांगरुन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर त्यामध्ये चांगलं कुजून गेलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापराव्या .


बीजप्रक्रिया-

उग्वणीच्या  काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.


पेरणी- 

सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.


खत व्यवस्थापन-

सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.


आंतरमशागत-

सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.


कीड व रोग व्यवस्थापन-

सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी नाजीकच्या कृषि सल्लागारचे मार्गदर्शन घेऊन योग्य खबरदारी घ्यावी. 

 • कोड नियंत्रण
 • खोड माशी
 • पाने पोखरणारी अळी
 • पाने खाणा-या आणि पाने गुंडाळणा-या अळ्या
 • रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.)
 • केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या
 • हुमणी

पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेच्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करावे. 


पिकाची काढणी, मळणी व उत्पादन-

जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी.

सोयाबीनला मार्केटमधील मागणीनुसार साधारण ४७०० ते १५०००  प्रति क़्वींटल भाव असतो. मागणी नुसार हा भाव नेहमी बदलत असतो. 


मित्रांनो आपल्याला हि माहिती कशी वाटली हे खाली दिलेल्या comment बॉक्स मध्ये नोंदवा. लवकरच आपल्यासाठी नवीन विषय घेउन येईन तो पर्यंत धन्यवाद !!!


  

 • Social Sharing
 • Like Facebook page to stay updated!

 • Recent Articles
 • No Recent Articles
Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 0

No Comment found!


Back to Articles List